राज्यात मे महिन्यातही कडक निर्बंध लागू राहणार? राजेश टोपेंचं मोठं विधान

राजेश टोपे

जालना – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कलम १४४ म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले असून नागरिकांनी अतिमहत्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असून आता हे कडक निर्बंध मे महिन्यातही वाढवण्यात येतील अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विधानामुळे निर्माण झाली आहे.

राजेश टोपे जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ‘राज्यात सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अजूनही आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. काही ठिकाणी कोविड-१९ च्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सीआरपीसीच्या कलम १४४ च्या उल्लंघनाचे प्रकार दिसून आले आहेत. राज्यात कोरोनामुळे ज्या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे ते पाहता राज्यात लावण्यात आलेले निर्बंध मे महिन्यापर्यंत पुढे वाढवण्यात येऊ शकतात. याबाबत स्थितीनुसार निर्णय घेतला जाईल,’ असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –