कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा – अर्जुन खोतकर

खोतकर

जालना – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा सुचना माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची मंगळवारी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी ऐवजी जमावबंदी आदेश लागू करत आठवडी बाजार, सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळ्यास मर्यादा असे निर्बंध लादल्यानंतरही शहर व ग्रामीण भागात सर्रासपणे या नियमांची पायमल्ली होताना दिसते, ही बाब लक्षात आणून दिली. तसेच, शारीरिक अंतर न राखणे सॅनिटाइजर चा वापर होत नसून मास्क न लावता सर्व व्यवहार बिनदिक्कतपणे सुरू असल्याने पुन्हा कोवीडचा विळखा घट्ट होत चालला असून जिल्हा प्रशासनाने महसूल, पोलिस ,आरोग्य नगरपालिका व ग्रामपंचायत या सर्व यंत्रणांकडून निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सुचना खोतकर यांनी दिल्या.

जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, १२२ नवे रुग्ण
कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन जणांचा मंगळवारी मृत्यू झाला, तर जिल्ह्यात आणखी १२२ रुग्णांची भर पडली आहे. यात जालना शहरातील ७२ बाधितांचा समावेश आहे. यामुळे आता जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ८१९ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ७०६ जणांना कोरोनाची लागण झाली. यातील १४ हजार ४९१ रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. तर ३०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या –