उस्मानाबाद : विनापरवाना ऊस गाळप केल्याप्रकरणी उस्मानाबाद तालुक्यातील नितळी येथील जय लक्ष्मी शुगर प्रॉडक्ट या साखर कारखान्याला जवळजवळ 35 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नियमाप्रमाणे ऊस गाळपापूर्वी साखर कारखान्याने साखर आयुक्तांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र असे न केल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारवाई करत जयलक्ष्मी शुगर्सला 34 लाख 94 हजार 557 रुपयांचा दंड ठोठावला.
जय लक्ष्मी शुगर साखर कारखान्याने गतवर्षी गाळप हंगामासाठी परवाना मिळावा याकरिता साखर सहसंचालकांमार्फत साखर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता. परंतु त्यात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. कारखान्याने त्रुटींची पूर्तता तर केलीच नाही, शिवाय ऊस गाळपाचा परवाना न घेताच कारखाना सुरू केला.
मागच्या हंगामात या कारखान्याने विनापरवाना तब्बल ६९८९ टन साखरेचे उत्पादन घेऊन ती साखर विक्रीही केली आहे. या कारणांमुळे साखर आयुक्तांनी कारखान्याविरुद्ध नोटीस काढली होती. सुनावणीअखेर साखर आयुक्तांनी कारखान्याला प्रतिटन ५०० रुपयांप्रमाणे 34 लाख 94 हजार 557 रुपयांचा दंड ठोठावला. कारखान्याला ही दंडाची रक्कम नोटीस मिळाल्याच्या 15 दिवसांत भरण्याचा आदेश देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- पिठाची गिरणी, छोटे किराणा दुकान, मिनी दाल मिल आदींसाठी मिळणार महिलांना अनुदान
- आज मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय
- ‘हे’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली फळ, जाणून घ्या फायदे
- अचानक हार्ट अटॅक आला तर काय कराल, जाणून घ्या