आठ दिवसाच्या आत आठ तास विजपुरवठा करा अन्यथा महावितरणच्या आधिकाऱ्यांवर नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार

महावितरण

करमाळा – करमाळा महावितरणच्या आडमुठ्या काराभारामुळे व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याने पुर्व भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याचा दुर्दैवी प्रकार सुरु आहे. पूर्व भागातील शेतकरी जेवढा सहनशील आहे तेवढा अक्रमक असुन पुर्व भागातील शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी महावितरणला दिला आहे. आठ दिवसाच्या आत आठ तास पुर्ण दाबाने विजपुरवठा करा अन्यथा महावितरणच्या आधिकाऱ्यांवर नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा फरतडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे

या बाबत अधीक बोलताना फरतडे म्हणाले की गेल्या महिन्यापासून पुर्व भागातील सिना कोळेगाव धरणावर अवलंबून असलेल्या कोळगाव, हिवरे,निमगाव, गौंडरे, आवाटी, हिसरे, या भागात महावितरणने जोरदार ने वसुली मोहीम राबवली आहे. बिलं न भरल्यास संपूर्ण रोहित्र सोडविण्यात आले, प्रत्येक रोहित्रावर (डिपी ) पन्नास हजार पासुन लाख रुपयांपर्यंत वसुली केली असुन विजपुरवठा करत आसताना मात्र महावितरण ने आडमुठी भुमीका घेतली आहे.

तालुक्यात पश्चिम भागात उजनी व पुर्व भागात सिना कोळेगाव, धरणाच्या पाण्यावर शेतकरी अवलंबून आहेत, मात्र प्रत्येक बाबतीत पुर्व भागावावर अन्याय होत आहे आज पश्चिम भागात पुर्ण दाबाने आठ तास विजपुरवठा होत असुन पुर्व भागात मात्र अवघा चार तास विजपुरवठा केला जात आहे तसेच ,या भागातील सिंगल फेज दोन महिन्या पासुन गायब असुन शेकडो वाड्या वस्त्या अंधारात चाचपडत आहेत, मात्र विज महावितरण आपल्याच मस्तीत मश्गुल आहे.

शेतकऱ्यांची ‘धरण उशाला व कोरड घशाला ‘अशी आवस्था झाली असून उस ,मका ,गुरांचा हिरवा चारा आशी हाता तोंडाशी अलेली पिके,करपुन चालली आहेत. कोरोनातुन सावरत असलेला शेतकरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चालवलेल्या मनमानी कारभारा मुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईची जबाबदारी सर्वस्वी महावितरण वर असुन आठ दिवसांच्या आत पाच एम व्ही चा ट्रान्स्फॉर्मर बसवुन आठ तासाचा विजपुरवाठा न झाल्यास महावितरण च्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले जाईल तसेच महावितरण च्या आधिकाऱ्यांवर नुकसान भरपाई चा दावा दाखल करणार असल्याचे फरतडे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे

महाविकास आघाडी सरकार कडुन शेतकऱ्यांना विज बिल दुरुस्ती साठी संधी द्या ,त्यांना सहकार्य करा अशा सरकारच्या सुचना आहेत तसेच वसुल झालेल्या बिलातुन स्थानिक पातळीवर विजेच्या दुरुस्त्या व विकास कामावर तो निधी खर्च करण्याचे स्पष्ट आदेश दिले आसताना नाहक शेतकऱ्यांना वेठीस धरत सरकारला बदनाम करण्याचा कुटील डाव महावितरण ने आखला असल्याचा आरोप फरतडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे

दरम्यान, अतिरिक्त भार झाला असल्याने रोहित्र जळत आहेत. अतिरिक्त भार झालेल्या डिपींचे सर्व्हे करुन शेतकऱ्यांना तात्काळ अॅडिशनल डिपी उभा करून द्या असे सरकारचे आदेश असुन या साठी निधी देखील उपलब्ध असुन महावितरण मात्र ठेकेदार जगवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वखर्चाने डिपी (प्रायव्हेट डिपी) करण्यासाडी भाग पाडत आहेत. त्यामुळे २५ / व ६३ च्या डिपीसाठी दो ते अडिच लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना भुर्दंड येत आहे. महावितरणचे आधिकारी मात्र याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ठेकेदार व महावितरणचे आधिकारी यांच्यात आर्थिक मिलीभगत असल्याची चर्चा असुन याची रितसर चौकशी करणयासाठी पाठपुरावा करणार असल्याचे फरतडे सांगीतले आहे

महत्वाच्या बातम्या –