मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये मोठी घट, पॉझिटिव्हिटी रेटमध्ये मोठी वाढ

कोरोना

औरंगाबाद – शहरात दररोज हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण निघत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला हादरे बसत आहेत. उपलब्ध बेड्सची संख्या आणि रुग्ण यात तफावत असल्याने कोविड सेंटर कमी पडत आहेत. तसेच पूर्वी तब्बल १२५ पर्यंत गेलेला कोरोना संसर्गाचा रिकव्हरी रेट पुन्हा एकदा लक्षणीय प्रमाणात घटत चालला आहे, ही बाब औरंगाबादसाठी चिंताजनक मानली जात आहे. पाॅझिटिव्हिटी रेट तब्बल २७ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. नागरिक नियम पाळत नसल्याने रूग्णवाढ अधिक झाल्यास आगामी काही दिवसांत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे आहेत.

फेब्रुवारी महिन्यातील १५ तारखेपासून औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. यातच मार्च महिना सुरू झाला आणि वाढत्या रूग्णसंख्येने एकदमच उसळी घेतली. मागील सहा दिवसांपासून तर जिल्ह्यात रोजचे हजारपेक्षा अधिक रूग्ण आढळत आहे. महापालिका, जिल्हा व पोलीस प्रशासन, घाटी प्रशासन, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अशी सर्व यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे.

कोरोना चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यासाठी पथके कार्यरत केली आहे. मात्र या सर्व उपाययोजना राबवतानाही नागरिक नियमांचे पाळताना दिसून येत नसल्याने कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दरम्यान, गुरूवारी जिल्ह्यात तब्बल १५५७ कोरोना रूग्ण निघाल्याने आरोग्य यंत्रणेला हादराच बसला आहे. तर शुक्रवारी शहरात १२५२ रुग्ण निघाले आहेत. त्यातून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा २८.०२ टक्के एवढा नोंदला गेला. तर रिकव्हरी रेट पूर्वीच्या १२५ वरून लक्षणीय प्रमाणात घटून ८२.५०० टक्क्यांपर्यंत घटला आहे.

महत्वाच्या बातम्या –