मोठी बातमी – राज्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी भर; गेल्या २४ तासात सापडले तब्बल ‘इतके’ रुग्ण

कोरोना

मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र राज्यात आज 31,855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 15098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 247299 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% झाले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत टॉप-१० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, पुणे जिल्ह्याचा क्रमांक यात अव्वल आहे.

महत्वाच्या बातम्या –