मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यात ३० मार्चपासून ते 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण लाॅकडाऊन

औरंगाबाद – दररोज शहरात हजारांच्या पुढे रुग्णसंख्या निघत आहे. संपूर्ण शहर हॉटस्पॉट होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असतांना औरंगाबाद शहरात ३० मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. ३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत हा लॉकडाऊन लागू असेल. लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने, दूध, भाजी देखील दुपारी १२ पर्यंतच उपलब्ध होणार आहे. त्यानंतर मात्र सर्व गोष्टी बंद केल्या जातील.

कोरोनाचा संसर्ग शहरात गतीने पसरत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या अफवा उडालेल्या होत्या. अनेकांची लॉकडाऊनच्या अफवेने भीतीने गाळण उडाली आहे. लॉकडाऊन आज होईल का उद्या याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काल लाईव्ह आलेल्या जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी देखील लॉकडाऊनचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.२७) जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांना प्राप्त अधिकारांनुसार औरंगाबाद शहरात पूर्णतः लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

या काळात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. खाजगी, सरकारी सर्व वाहनांना या काळात बंदी असेल. जलतरण तलाव, जिम, हॉटेल्स सुविधा पूर्णपणे बंद असतील. सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादी कार्यक्रमांवर पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. खाजगी, सरकारी वैद्यकीय सेवा पूर्णपणे सुरु असतील. या काळात ठोक दुकानदार,विक्रेते, दूध, भाजीपाला विक्रेते यांना दुपारी १२ पर्यंतच विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. उद्योग व्यवसायांना यात वगळण्यात आले आहे. त्यामुळे उद्योगधंदे सुरु असतील.

महत्वाच्या बातम्या –