मोठी बातमी – महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता

संचारबंदी

मुंबई – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी सवांद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही महाराष्ट्रासाठी धिक्याची घंटा असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

याच पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील अत्यंत वरिष्ठ आणि विश्वसनीय सूत्रांनी एका वृत्तपत्राला दिलेली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याची देखील माहिती सध्या मिळत आहे.

मला नियम पाळताना दृश्य स्वरूपात दिसलं नाही तर २ दिवसात पूर्ण लॉकडाऊन करणार, आता लावत नाही पण हा इशारा देतोय. तसेच मला दोन दिवसांत जर कोणतेही पर्याय नाही मिळाले तर दुर्दैवाने मला लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला होता.

महत्वाच्या बातम्या –