मोठी बातमी – दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलनावर बनणार चित्रपट

शेतकरी

मुंबई – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राच्या निषेधार्थ व आंदोलनाच्या समर्थनात देशभर आक्रोश व्यक्त केला जात आहे. या आंदोलना दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील कित्येक बैठका या निष्फळ ठरल्या. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये काढलेल्या ट्रॅक्टर रॅली वेळी झालेल्या गोंधळानंतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी देखील यावर भाष्य केल्यानंतर शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण लागल्याचे दिसून आले. या वरून राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करता अनेक खेळाडू आणि कलाकारांनी सरकारला पाठींबा दिला. या सर्व घटनाक्रमानंतर आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा लवकरच शेतकऱ्यांवर आधारित एक चित्रपट तयार करणार आहेत.

‘दिल्ली 6’ आणि ‘रंग दे बसंती’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन राकेश यांनी केले आहे. बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट तयार करण्यासाठी राकेश यांची ओळख आहे. शेतकऱ्यांवर आधारित चित्रपटाचे लेखक कमलेश पांडे आहेत. एका मुलाखती दरम्यान कमलेश पांडे यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. यासह त्यांनी सांगितले की, या चित्रपटावर बऱ्याच दिवसांपासून काम सुरू आहे. कमलेश म्हणाले की, या चित्रपटाची मुळ कथा शेतकऱ्यांवर आधारित आहे त्यामध्ये दाखवण्यात येणार आहे की, शेतकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत दररोज त्यांना कुढल्या परिस्थितीला सामोरे जावे लागते.

आम्ही या चित्रपटावर गेल्या चार वर्षांपासून काम करत आहोत आणि देशात शेतकरी आंदोलन सुरू आहे. जर चित्रपटाच्या निर्मात्याने ठरवले तर आम्ही दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देखील यामध्ये जोडू शकतो. जर असे झाले तर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर हा चित्रपट तयार होऊ शकतो.

मात्र, अद्याप या चित्रपटाचे नाव घोषित करण्यात आले नाही आणि आताच्या परिस्थितीमध्ये हा चित्रपट तयार झाल्यावर तो चित्रपट सुपरहिट होऊ शकतो असा अंदाज आहे. मिळालेल्या एका रिपोर्टनुसार या चित्रपटात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन दाखवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकरी आंदोलनाला बॉलिवूडचा पाठिंबा आहे असे अधोरेखित होत आहे. तर ६ मार्चला शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहेत.

महत्वाच्या बातम्या –