मोठी बातमी – देशात गेल्या २४ तासांत करोना रुग्ण संख्येत मोठी भर

कोरोना

मुंबई – भारतात करोना संक्रमणावर नियंत्रण येतंय असं वाटत असतानाच परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होत असल्याचं दिसून येतंय. देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या तब्बल ८९ हजार १२९ वर गेलीय. यामुळे आतापर्यंतच्या एकूण संक्रमितांची संख्या १ कोटी २३ लाख ९२ हजार २६० वर पोहचलीय.गेल्या सात महिन्यांमध्ये आढळलेला हा सर्वात मोठा आकडा आहे. या अगोदर २० सप्टेंबर २०२० रोजी एका दिवसात संक्रमणबाधित ९२ हजार ६०५ रुग्ण आढळले होते.

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 23 लाख 3 हजार 131 झाली आहे. देशात सध्या 5 लाख 84 हजार 55 जणांवर उपचार सुरू असून त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे 3 लाख 57 हजार 604 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशभरात 1 कोटी 15 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93 टक्के आहे.

देशात काल 469 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकंदर मृतांची संख्या 1 लाख 63 हजार 396 झाली आहे. देशातल्या एकंदर मृतांमध्ये देखील महाराष्ट्रातल्या मृतांची संख्या जास्त असून राज्यात आतापर्यंत 54 हजार 649 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 227 जणांचा मृत्यू झाला; त्या खालोखाल पंजाबमध्ये 55 तर छत्तीसगड मध्ये 39 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या भीषण परिस्थितीमुळे राज्यावर पुन्हा टाळेबंदीचे ढग दाटून येवू लागले आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –