मोठी बातमी – राज्यात गेल्या २४ तासात कोरोना बाधितांच्या आकड्यात मोठी भर

कोरोना

मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात आज २५६८१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन १४४०० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २१८९९६५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १७७५६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.४२ % झाले आहे.

मुंबईत दररोज अडीच हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सर्व मुंबईकरांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खासगी रुग्‍णालयांमध्‍ये लसीकरणाचे प्रमाण पालिका रुग्णालयांच्या तुलनेने अत्‍यल्‍प आहे.

त्यामुळे खासगी व पालिका रुग्णालयांची आयुक्‍त इकबालसिंह चहल यांनी शुक्रवारी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे विशेष बैठक घेतली. यावेळी रुग्णालयांतील खाटांचे व्यवस्थापन तसेच लसीकरण यावर आयुक्‍तांनी सूचना केल्‍या आहेत.

याच भयानक परिस्थितीमुळे राज्यात निर्बंध अधिकच कडक करण्यात आले आहेत. लग्न समारंभात ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडावा. असे शासनाकडून सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –