मोठी बातमी – दिल्लीत परवानगी नाही म्हणून ३० जानेवारीपासून अण्णा हजारे मंदिरातच उपोषण करणार

अण्णा हजारे

अहमदनगर – दिल्ली सीमेजवळ शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यासंबंधी केंद्र सरकारने नरमाईची भूमिका घेतली असल्याने शेतकरी नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील शेतकऱ्यांसाठी आपल्या आयुष्यतील शेवटचे आंदोलन पुकारले आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनाला परवानगी मिळण्यासंबंधी पत्रव्यवह केला आहे. याला अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. दिल्लीत परवानगी मिळत नसल्याचे गृहीत धरून ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा निर्णय अण्णा हजारे यांनी घेतला आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी राज्य सरकारला कळविले असून भाजपच्या नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

दरम्यान, अण्णांचे आंदोलन वेगळ्या मागण्यांसाठी आहे. दिल्ली सीमेजवळील शेतकरी आंदोलनावर त्यांचा निर्णय अवलंबून नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे केंद्र सरकारला यासाठी हजारे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करावी लागणार आहे. अण्णांची अपेक्षाही तशीच आहे. मधल्या काळात भाजपच्या राज्यातील नेत्यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, हे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने त्या सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जाव्यात यावर अण्णा हजारे ठाम आहेत.

दिल्लीत केंद्र सरकारला आणि मैदानाची परवानगी मिळविण्यासाठी पाठविलेल्या पत्रांना उत्तर आलेले नाही. त्यामुळे दिल्लीला न जाता राळेगणसिद्धीतच ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे. राज्यात आंदोलन होणार असल्याने यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना कळविण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –