मोठी बातमी – राज्यातील ‘या’ साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश

साखर

औरंगाबाद – साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी २०२०-२१ या हंगामातील शेतक-यांचे उसाचे गाळप  देयके थकवल्यामुळे विहामंडव्यातील शरद सहकारी कारखान्याच्या मालमत्ता जप्त करण्याचे नुकतेच आदेश दिले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच देयके मिळण्याचे सांगण्यात येत आहे.

शरद सहकारी साखर कारखान्याने शेतक-यांच्या उसाचे पैसे थकवल्याने साखर आयुक्त पुणे यांनी १७ कोटी ४९ लाख, ५९ हजार रुपये थकवल्या प्रकरणी व तसेच कलम ३ (३ए) प्रमाणे १५ टक्के व्याजासह रक्कम वसुलीचे आदेश दिलेले आहे. विशेष म्हणजे या कारखान्याचे चेअरमन मंत्री संदीपन भुमरे हे आहे.

थकीत रक्कम हि कारखान्याकडून उत्पादीत साखर, मॉलेसिस, बगॅस अश्या गोष्टींची विक्री करुन वसुल करण्यात यावी, अवश्यकता भासल्यास कारखान्याच्या स्वताच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर शासनाच्या नावाची नोंद करावी, तसेच मालमत्ता जप्ती करुन ती विहीत नमुन्यात विक्री करुन विक्रीच्या रकमेतुन उस नियंत्रण तरतुदीनुसार देयकाची रक्कम खात्री करुन विलंबीत कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह अदा करण्यासाठी आदेश करुन जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले असे साखर आयुक्तांच्या आदेशात नमुद आहे.

महत्वाच्या बातम्या –