मोठी बातमी – ‘या’ अटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार

शेतकरी

औरंगाबाद – जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या खरिप पिकांचे अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले आहे. मात्र पीक विम्याची रक्कम भरुनही नुकसान मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याला कारण आहे संबधित कंपन्याची अट. या आटीनुसार नुकसान झाल्याच्या ७२ तासाच्या आत नुकसानाची माहिती ही संबधित टोल फ्री क्रमांकावर कळवीणे अनिवार्य आहे.

शेतपीकांचे नुकसान झाल्यानंतर त्याची माहिती शेतकऱ्यांना कंपनीला देता आलेली नव्हती. आधिच शेतातील मालाचे नुकसान बघुन मानसिक दृष्या शेतकरी खालावतो. या मनस्थितीत ७२ तासाच्या आत टोल फ्री नंबर वर नुकसानाची इंत्यभूत माहिती कशी देणार. यामुळे अनेक शेतकरी पीक विम्याची रक्कम भरूनही नुकसानीची इत्यंभूत माहिती कंपनीला न देता आल्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

तालुक्याची खरिपाची अंतिम आणेवारी ४७ टक्के इतकी घोषित झालेली असुन, ५० टक्क्यांच्या आत महसूल प्रशासनाने खरिपाची आणेवारी असल्याची माहिती संबंधित कंपन्या आणि जिल्हा प्रशासनाला कळविलेली आहे. मात्र, कंपन्या टोल फ्री क्रमांकाच्या कॉलवर ठाम आहेत. महत्वाची बाब म्हणजे अनेक शेतकऱ्यांना ही अट माहिती नसल्याने ७२ तासांची ही जाचक अट त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. यावर तातडीने तोडगा काढून पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा सरसकट मंजूर करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

महत्वाच्या बातम्या –