मोठी बातमी – जानेवारीत अण्णा हजारे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार

अण्णा हजारे

अहमदनगर – केंद्र सरकारने केलेल्या तिन्ही कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या चर्चा निष्फळ ठरत आहे. सरकार चर्चेला तयार आहे. पण कृषी कायदे रद्द केले पाहिजेत त्यानंतरच चर्चा असे शेतकऱ्यांची मागणी आहे.

दरम्यान,कृषी कायद्यांचा निषेध करत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलना ला तब्बल महिना झाला आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास नकार देत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यासाठी अण्णा हजारे यांनी परवानगी मागितली असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते आंदोलन करणार आहेत.

याआधी भाजपचे नेते हरिभाऊ बागडे आणि गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली होती. तसेच अण्णांनी शेतकरी आंदोलनात भाग घेऊ नये म्हणून प्रयत्न केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही अण्णा असं काही आंदोलन करणार नाहीत असं म्हटलं होते.

महत्वाच्या बातम्या –