मोठी बातमी – राज्यातील तब्ब्ल ५२ कारखान्यांकडून गाळप बंद

सहकारी साखर कारखाना

पुणे – राज्यातील गाळप हंगाम आता पूर्णपणे अंतिम टप्प्यात पोहचत आला आहे. राज्यात १८ मार्च २०२१ पर्यंत तब्ब्ल ५२ साखर कारखाने बंद झाले आहेत.अशी माहिती देण्यात आली आहे.

राज्यात १८ मार्च २०२१ पर्यंत १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात भाग घेतला अशी माहिती साखर आयुक्तालयाने दिली आहे. राज्यात ९२०.२३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून ९५७.५७ लाख क्विंटल उसाचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४१ टक्के आहे. अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागात ९ कारखाने बंद झाले आहेत. तर अहमदनगर विभागात ३ कारखाने बंद करण्यात आले आहेत. औरंगाबाद, नांदेड, पुणे, अमरावती विभागात प्रत्येकी २ कारखाने बंद झाले आहेत. असे राज्यातील साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –