मोठी बातमी – ‘या’ दिवशी दूध उत्पादक शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रभर करणार आंदोलन

दूध

सध्या दुधाची मागणी घटली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी हे मोठ्या अडचणीत आहे. सध्या दुध हे पाण्याच्या भावाने विकले जात आहे. तसेच पशुखाद्याचे दर हे वाढलेले आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध दरासाठी १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होणार आहे. किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे.

तसेच किसान सभा दूध दराबाबत तक्रार घेऊन राज्यभरातील अधिकाऱ्यांकडे जाणार आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी डॉ. अशोक ढवळे आणि डॉ. अजित नवले यांनी आव्हान केलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांची खासगी व सहकारी दूध संघाकडून खूप जास्त लूटमार करण्यात आली आहे. तसेच या कोरोनाच्या काळामध्ये सहकारी दूध संघांनी दुधाची मागणी खूप कमी झाल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांची व त्याचबरोबर ग्राहकांची देखील लूटमार केली आहे. दूध उत्पादकांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, यासाठी किसान सभेची बैठक झाली होती.

तसेच सध्या खरीप हंगाम तोंडावर असताना अनेक ठिकाणी खतांची टंचाई होत आहे, यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनच्या काळात दूधाचे दर तब्बल १२ रूपयांनी कमी झाले आहेत. या अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी तसेच दूध उत्पादकांनी जनावर सांभाळायची कशी हा प्रश्‍न उभा राहिला आहे.

महत्वाच्या बातम्या –