मोठी बातमी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधक लस!

लस

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार, १ मार्च २०२१) सकाळी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतला. आणखी २८ दिवसांनंतर ते लसचा दुसरा डोस घेतली. पंतप्रधानांनी स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवर ही माहिती दिली. दिल्लीच्या एम्समध्ये कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कोरोनाची लसीकरणाच्या मोहिमेचा तिसऱ्या टप्पा आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांनी COVAXIN लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्देचरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची लस दिली आहे.

‘AIIMS हॉस्पिटलमध्ये COVID-19 लस घेतली आहे. आपले डॉक्टर आणि शास्त्रांनी कोरोनाच्या विरोधातील लढाईत कमी वेळेत महत्त्वाचे काम केले आहे. जी लोकं कोरोना लस घेण्यासाठी योग्य आहे, त्यांनी लस टोचून घ्यावी, आपल्या सर्वांना भारत कोरोनामुक्त करायचा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पंतप्रधान मोदींनी दिली.

देशात लसीकरणाच्या  तिसऱ्या टप्प्याल सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –