मोठी बातमी – राहुल गांधींच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘हे’ आव्हान

राहुल गांधी

नवी दिल्ली – प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओ कार्यक्रम मन कि बात मधून देशवासियांशी संवाद साधत असतात. यामध्ये ते देशात सुरु असलेल्या अनेक विषयांवर बोलत असतात. त्यामुळे आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमा पूर्वी आव्हान दिले आहे कि हिंमत असेल तर शेतकरी आणि रोजगार विषयी बोला.

सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ मधून संवाद साधत आहेत. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘हिम्मत है तो करो – #KisanKiBaat #JobKiBaat’, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे.

दरम्यान, राहुल गांधी सतत विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहे. शनिवारी महागाईच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर राहुल गांधींनी हल्लाबोल केला होता. ‘अशी एखादी जागा आहे, जिथे आपल्याला दैनंदिन वस्तू मिळतात आणि तेथे जाऊन आपल्याला असे वाटू नये की सरकार आपल्याला लुटत आहे?’ असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या – 

  1. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करायचा की नाही? अजित पवार म्हणाले….
  2. राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अवघ्या अकरा दिवसांत तब्बल १७०० नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले
  3. राज्यात कोरोना वाढत असल्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय
  4. राज्यातील कोरोना बाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती
  5. ठाकरे सरकारने प्रति हेक्टरी दहा हजार रूपये नुकसान भरपाई देवु असं सांगितलं, मात्र शेतकऱ्यांना ते पैसे मिळालेच नाहीत