मोठी बातमी – कोरोना संसर्ग वाढत असल्याने ‘या’ जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये १४ मार्च पर्यंत बंद

महाविद्यालय

पुणे : कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे शहरात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. असे आदेश दिले आहेत. ही माहिती त्यांनी ट्वीट करत दिली आहे.

पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शहरात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता संपर्क शोध मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र तरीही आकडे काही कमी होत नाहीयेत. यामुळे आता पुणेकरांची चिंता निशितच वाढलेली पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –