मोठी बातमी – कोरोना रोखण्यासाठी ‘या’ जिल्ह्यात पुढील एक महिन्याकरिता कलम १४४ लागू

कोरोना

जालना – अनलॉकनंतर नागरिकांसह प्रशासनाला कोरोनाचा विसर पडल्याचे जाणवत आहे. पर्यायाने कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दूर्लक्ष झाले. याचा परिणाम असा झाला की कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागल्याने प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. याच अनुषंगाने कोरोना रोखण्यासाठी जालना पोलीस अधीक्षकांनी पुढील एक महिन्याकरिता जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे. यामुळे मोर्चा, निदर्शने, उपोषण आदी आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू केली. मात्र, कोरोना हद्दपार झाल्याप्रमाणे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास सुरवात केली आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांच्या संख्येत प्रत्येक दिवसाला वाढ होत आहे.

तर दुसरीकडे फिजिकल डिस्टेंसिंगचा नियमचे देखील पालन होत नाहीये. तसेच बाजारपेठेतील विविध दुकाने, एटीएम सेंटर, खासगी आणि शासकीय कार्यालयातील सॅनिटायझरही दिसेनासे झाले आहे. जिल्हा प्रशासनाने ही या सर्व बाबींकडे दूर्लक्ष केले. त्यात मध्यंतरी जिल्ह्यात मोर्चे, ठिय्या आंदोलने, निदर्शने आदी आंदोलनास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. तर दुसरीकडे लग्न, धार्मिक कार्याक्रमांना उपस्थितीत लोकांच्या नियमांकडे जिल्हा प्रशासनाकडून दूर्लक्ष करण्यात आले. परिणामी जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत.

कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत असताना पुन्हा जालना जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी जिल्ह्यात पुढील एक महिन्यापर्यंत कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात या पुढे मोर्चा, निदर्शने, उपोषण आदी आंदोलने करण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना निवेदन देण्यासाठी एकत्र येण्यास ही मनाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –