नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा प्रदूरभाव झाल्याने सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्रास देखील यामुळे अनेक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या बोर्डांच्या परीक्षांचे वेध लागण्यास आता सुरुवात झाली आहे.
अशातच, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकार अधिक सतर्क झालं आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी वर्तवलेल्या कोरोना लाटेचा अंदाज देखील केंद्राने येत्या काळातील नियोजनासाठी लक्षात घेतला आहे. भारतात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून केंद्राने पावले उचलले आहेत.
त्यामुळेच CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबतही केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान, CBSE बोर्डाकडून ३ डिसेंबर रोजी, ‘2021च्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन नाही तर लेखी परीक्षा घेण्यात येतील. याबाबत अद्याप चर्चा सुरू असून बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच त्याही तारखा जाहीर केल्या जातील,’ असं स्पष्ट केलं होतं. आता, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं समजत असून पुढील नियोजन अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
महत्वाच्या बातम्या –
- लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- चांगली बातमी – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची मोठी भरती
- कोरड्या खोकल्याने त्रस्त असल्यास, करा ‘हे’ घरगुती उपाय
- कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे आजपासून राज्यात संचारबंदी