मोठी बातमी – कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत असल्यामुळे राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागणार

जमावबंदी

मुंबई – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले आहेत, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

तर, केंद्रीय आरोग्यमंत्रालयातर्फे देशातील टॉप-१० कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांची घोषणा करण्यात आली आहे. देशात ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये पुणे जिल्हा अव्वल आहे. पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगलोर अर्बन, नांदेड, दिल्ली आणि अहमदनगर या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. टॉप-१० जिल्ह्यांमध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश असल्याने राज्यातील धोका झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची तयारी ठेवा अशा सूचना याआधी प्रशासनाला दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची आढावा बैठक पार पडली असून मंत्र्यांनी लॉकडाऊन करण्यास विरोध केल्याचं समजत आहे. कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको अशीच भावना देखील सामन्यांमध्ये आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, राज्यातील 8 जिल्ह्यामध्ये निर्बंध लावण्यात येणार असल्याचे संकेत एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले आहेत. यामुळे, देशातील टॉप-१० ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये समावेश असलेल्या पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागल्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –