मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्येने ओलांडला ५०,००० हजारांचा टप्पा

कोरोना

औरंगाबाद – मागील वर्षभरापासून कोरोनाशी लढत असलेल्या जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनासाठी एक दुख:द बातमी आहे. मागील मार्च महिन्या २२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासुन जवळ पास ११ महिन्यांनी २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्येने ५०,००० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे २९७ नवे रुग्ण आढळले. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ही ५०,११० वर पोहोचली आहे. शनिवारी ६९ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४६,९२७ झाली आहे. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण १९७१ आहेत. कोरोना मुळे गेलेल्या बळींचा आकडा १२६६ वर गेला आहे.

मागील काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा नव्याने वाढत आहे. मागील १०-१५ दिवसात कोरोना रुग्णांची होणारी वाढ ही चिंताजनक आहे. यावर उपाय म्हणून मनपाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. पण नागरिक मात्र कोणत्याही प्रकारे कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. वेळोवेळी हात स्वच्छ करणे, मास्क वापरा सांगुनही शहरातील नागरिकांच्या बेशिस्तीमुळे शहराने कोरोना रुग्णांचा ५०,००० टप्पा पार केला आहे.

महत्वाच्या बातम्या –