मोठी बातमी – कोरोनाचे सर्व नियम पाळले नाहीत तर राज्यात लॉकडाऊन जाहीर करावा लागेल

उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत.

जर का महाराष्ट्रातील जनतेने कोरोनाचे सर्व नियम पाळले नाहीत. तर आगामी काळात निश्चितच नाईलाजाने लॉकडाऊन जाहीर करावा लागेल. यामुळे लॉकडाऊन करायचा कि नाही हे पूर्णपणे जनतेवर अवलंबून आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आठ दिवसांचा कालावधी दिलेला आहे. जर का या आठ दिवसांत जनतेने कोरोनाचे सर्व नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन जाहीर करावा लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी सांगितले.

“कोविड योद्ध्यांचा सत्कार जरूर करा पण सत्कार करताना त्यांच्या कामाचे गांभीर्य पण जाणून घ्यावे लागेले. त्याचं समाजासाठीच योगदान हे अमूल्य आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करनारेच हे का बंद ? हे का उघडे ? असले प्रश्न उपस्थित करून राजकारण करतात आपण आता याच्या पुढचा विचार केला पाहिजे असले राजकारण करणे आता आता सोडून द्यायला हवे.” असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता व्यक्त केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पुणे व नाशिक या शहरांमध्ये नाईट कर्फ्यूच्या सूचना दिल्या आहेत. तर, अमरावतीमध्ये मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशांनुसार सोमवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –