मोठी बातमी – पुढील आठवड्यात कोरोनावरील जगातील पहिली लस ‘या’ देशात उपलब्ध होणार

कोरोना

नवी दिल्ली- पुढील आठवड्यात कोरोनावरील जगातील पहिली लस उपलब्ध होणार असून फायझर आणि बायोएनटेकच्या लसीला ब्रिटन सरकारने परवानगी दिली आहे. ही लस ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. ब्रिटन हा कोरोनावरील लसीला परवानगी देणारा पहिला देश ठरला आहे.

UK सरकारनं फायझर-बायोएनटेक या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे UKमध्ये आता मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे.

दरम्यान, फायझरची लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा अहवाल देखील कंपनीने सादर केला होता. कोरोनाने जगभर कहर केला असताना त्यानंतर फायझर लसीला ब्रिटनने दिलेली मंजुरी ही सकारात्मक बातमी असल्याचे म्हणता येईल.

जगात फायझरच्या लशीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या –