मोठी बातमी – राज्यातील तब्बल आठ धरणांची पाणी पातळी खालावली

मुळा’ धरण

औरंगाबाद – सोयगाव तालुक्यात असलेल्या अकरा धरणांपैकी तब्बल आठ धरणांची पाणीपातळी अवघ्या दोन दिवसात चाळीशीवर येवून ठेपली आहे. उर्वरित तीन धरणे मात्र पन्नास टक्क्यांवर आहे. दोनच दिवसात कडाक्याच्या उन्हात बाष्पीभवन झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

सोयगाव तालुक्यात पाटबंधारे विभागाची अकरा प्रमुख धरणे आहे. या  सर्व प्रकल्पांवर ८७ गावांतील पाणी पुरवठा अवलंबून आहे. मात्र, अचानक उन्हाच्या तीव्रतेने या धरणांची पाणी पातळी अवघ्या चाळीशीवर आली आहे.यामुळे सोयगाव तालुक्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी ८७ गावातील नागरिकांना भटकंती करावी लागेल की काय ही भीती आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी नागरिकांवर येवून ठेपली आहे.

मार्चच्या पहिल्याच दिवशी पाटबंधारे विभागाच्या अकरा पैकी आठ धरणांची पाणीपातळी चाळीस टक्क्यांवर आली आहे. उन्हाची तीव्रता कायम राहिल्यास कायम राहिल्यास ही आठ धरणे आठवडाभरातच मृत साठ्यावर येवून ठेपण्याची भीती व्यक्त होत आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत शंभर टक्के पाण्याची पातळी असलेल्या धरणांची अवघ्या महिनाभरातच ही अवस्था झाली आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात तीव्र पाणी टंचाईची संकट भेडसावणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

महसूल आणि पंचायत समितीच्या संयुक्त पथके सज्ज
सोयगाव तालुक्यातील धरणे चाळीशी गाठल्याने महसूल आणि पंचायत समितीचा पाणी टंचाई विभाग सतर्क झाला असून विहिरींच्या अधिग्रहणाचे प्रस्ताव तातडीने पंचायत समितीच्या कार्यालयाला सादर करण्याबाबतच्या सूचना संबंधित ग्रामसेवक आणि मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सोयगाव तालुक्यात टँकर बाबतही पाणी पुरवठा करण्याची वेळ येउ शकते असा अंदाज तालुका प्रशासनाला आल्याने यासाठी हालचाली तालुका पातळीवर सुरू झाल्यात.

पाणी पातळी कमी झालेली धरणे
वरखेडी- ३४ टक्के, हनुमंतखेडा-४५, अंजना-४३, गोंदेगाव-३६, वरठाण-४५, देव्हारी-४६, जंगलातांडा-४०, धिंगापूर-५५ आणि काळदरी-३० ही धरणे चाळीस टक्क्यापर्यंत आली आहेत. केवळ वेताळवाडी ५७ आणि बनोटी प्रकल्पाची पातळी ५१ टक्के इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या –