‘या’ जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक

कोरोना

पुणे – कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

पुणे शहरात आज नव्याने २ हजार ३४२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ३७ हजार ७३६ इतकी झाली आहे. शहरातील १ हजार ७८९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ०९ हजार ६०६ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात ११ हजार ८९० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १३ लाख ३८ हजार ६८९ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २३ हजार ०६२ रुग्णांपैकी ५२४ रुग्ण गंभीर तर ९५८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने १५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ०६८ इतकी झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील सीओईपी ग्राऊंडवरील जम्बो कोविड रुग्णालयात मंगळवारपासून रुग्ण दाखल करून घेण्याला सुरूवात केली जाणार असून, सुरूवातीला अडीचशे बेडची व्यवस्था केली जाणार असून, शुक्रवारपर्यंत ५०० बेडची व्यवस्था पूर्ण होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दिली.

महत्वाच्या बातम्या –