देशात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता; महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत पाऊस पडणार

पाऊस

मुंबई – राज्यात सध्या गेल्या काही दिवसांत गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या बद्दलची शेतकऱ्यांची चिंता काहीशी मिटली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संथ्या असलेल्या स्कायमेट वेदरचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश पालावल यांनी सांगितले की, देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगाणा आणि तामिळनाडू या राज्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र या वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरुवातीच्या दिवसांमध्ये हवामान बदलणार असून, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत पाऊस पडणार आहे.

येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान कोकण वगळता मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.दरम्यान राज्यात तापमानातही अपेक्षित वाढ सुरू झाली असून आगमी ३६ तासांत दोन अंशांची तापमान वाढ अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या –