मुंबई – कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. पण या सर्व संकटात शेतकऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. यंदा सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटने यंदा मान्सूनमध्ये १०३ टक्के पाऊस पडण्याचे भाकित केले आहे.
स्कायमेटच्या अंदाजानूसार, जून ते सप्टेंबर या काळात देशात सामान्यपणे ८८०.६ मिमी पाऊस पडतो. यंदा पावसाळ्यात ९०७ मिमी पावसाची शक्यता आहे. हे प्रमाण सरासरीच्या १०३ टक्के आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस झाल्यास मान्सून सरासरी श्रेणीत गणला जातो. पण या आकडेवारीत ५ टक्के कमी जास्त होऊ शकते.
देशात जूनमध्ये पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा व आंध्र प्रदेशात चांगला पाऊस होईल. उत्तर पश्चिमेकडील मैदानी भाग – पंजाब, हरियाणा, दिल्लीत तसेही मान्सून जूनच्या अखेरीस पोहोचतो. जुलैत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा व आंध्र प्रदेशात चांगला पाऊस होईल. पश्चिम घाटावरील किनारपट्टीचा भाग- गोवा, कर्नाटकात सरासरीहून कमी पाऊस असेल.
सलग तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस
२०१९ मध्ये ११० टक्के आणि २०२० मध्ये १०९ टक्के पाऊस झाला होता. मान्सूनमध्ये सामान्यत: एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाल्यास पुढील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो असे दिसते. पण हवामानाच्या इतिहासात यापूर्वी १९९६ मध्ये १०३.४ टक्के, १९९७ मध्ये १०२.२ टक्के व १९९८ मध्ये १०४ टक्के पाऊस नोंदवला होता. आताही सलग तिसऱ्या वर्षी दमदार पाऊस पडणार असा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत
- उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात आज महत्वाची बैठक; लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय येण्याची शक्यता
- मोठी बातमी: राज्यात गेल्या 24 तासांत रेकोर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट; राज्यात कांद्याचे दर कोसळले
- राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने केंद्राने महाराष्ट्र सरकारला पाठवलं पत्र