मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे, किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही

रामदास आठवले

मुंबई – कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल होत आहेत. राज्याच्या 21 जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच 180 किलोमीटरपर्यंत रॅली काढत शनिवारी रात्री मुंबईत पोहोचले आहेत.

मुंबईतील आझाद मैदानात सभा झाल्यावर आंदोलक आझाद मैदान ते राजभवनापर्यंत कृषी कायद्याविरूद्ध मोर्चा काढतील अशी शक्यता आहे. दरम्यान,महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मुंबईतील आंदोलन हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण मोदी काही शेतकरी विरोधी नाहीत. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्नच नाही. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या ऐकून त्यानुसार काम देखील केलं गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं’, असं रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –