चांगली बातमी – देशात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार; केंद्रीय हवामान विभागाचा अंदाज

पाऊस

नवी दिल्ली – यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या संदर्भातील परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर केलाय. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचे आयएमडीने सांगितले आहे.परिपत्रकात म्हटले आहे की, पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून दीर्घ कालावधीसाठीचा दोन टप्प्यांमध्ये सरासरी अंदाज वर्तवला जातो. यात एप्रिल महिन्यात एक आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दिला जातो. दुसरा अंदाज अधिक सविस्तरपणे दिला जातो. यामध्ये देशभरात मान्सूनचा प्रवास कसा राहील, याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.

मान्सूनने वेळेवर हजेरी लावली तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार आहे. मान्सून सामान्य स्वरुपाचा होणार याचा अर्थ पिकांसाठी चांगला पाऊस होईल. कोरोनाच्या महामारीमध्ये शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे, त्यामुळे ही बातमी त्यांच्यासाठी नक्कीच दिलासादायक आहे.

महत्वाच्या बातम्या –