चांगली बातमी – राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम

कोरोना

मुंबई – राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

राज्यात गेल्या २४ तासात 13 हजार 659 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. तर 24 तासात 21 हजार 776 रुग्ण बरे झाले आहेत. तर 300 जणांचा दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 28 हजार 834 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 लाख 88 हजार 27 इतके सक्रीय रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.01% इतके झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.71% एवढा आहे. सध्या राज्यात 14,00,052 व्यक्ती या होम क्वारंटाईन आहेत. तर 7 हजार 93 जणं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

विशेष म्हणजे राज्यात गेल्या 3 महिन्यानंतर सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. याआधी 10 मार्चला इतकेच म्हणजेच 13 हजार 659 नवे कोरोना बाधित सापडले होते.

महत्वाच्या बातम्या –