चांगली बातमी – राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शेतकरी

हरियाना – हरियाणा राज्यात रब्बी पिकांची खरेदी १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं खरेदी केंद्रांमध्येही यावेळी वाढ केली जाऊ शकते. शेतकरी व नोकरदारांना शेतमालाची विक्री करताना कोणतीही अडचण येणार नाही.

मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खरेदी व्यवस्था व अन्य मुद्द्यांचा आढावा घेत सूचना दिल्या. यंदा गहू, मोहरी धान्य, सूर्यफूल, हरभरा आणि बार्ली या पिकांची किमान आधारभूत किमतीवर खरेदी केली जाईल.

हरियाणा सरकारने रब्बी हंगामातील पिकाच्या खरेदीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या खरेदी प्रक्रियेदरम्यान राज्य सरकार थेट शेतकऱ्यंच्या खात्यात सर्व रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे पाठवणार आहे. गेल्या वर्षी सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ५० टक्क्यांहून अधिक पेमेंट केले होते.

राहिलेली रक्कम बाजार समितीच्या पारंपारिक पद्धतीद्वारे पाठवली होती. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्यांना या बदलाबाबत आडत्यांशी चर्चा करण्यास सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की पीक कापणीचा हंगाम जवळ आला असल्याने खरेदी केंद्रांमध्ये पुरेशी व्यवस्था करावी. कोरोना रुग्णसंख्येमध्ये झालेली वाढ लक्षात घेता शेतमाल खरेदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी.

कोरोना प्रसार रोखण्यासाठीच्या प्रोटोकॉलचं पालन प्रत्येक खरेदी केंद्रावर काटेकोरपणे केले जावे. कोरोना नियमांचं पालनं जिल्हा उपायुक्तांनी करावे , अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. माझे पीक-माझी माहिती पोर्टलवर सर्व माहिती भरा,असं आवाहन खट्टर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या –