गर्दी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, परंतु लॉकडाऊन परत नको; व्यापाऱ्यांची मागणी

संचारबंदी

पुणे – कोरोना पुन्हा वाढत असल्याने सध्या सर्वत्र पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोरोना वाढला लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने व्यावसायिक, कामगार, नागरिक धास्तावले आहेत.

झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या तसेच पुन्हा राज्यात लॉकडाऊन घोषित करण्याच्या बातम्या समोर येवू लागल्याने शेतकरी आणि व्यापारीवर्ग देखील हवालदिल झाला आहे. हा काळ नेमका फळपिकांच्या काढणीचा काळ असल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.तर दुसऱ्या बाजूला सरकारने काही निर्बंध घालावे परंतु पुन्हा लॉकडाऊन करू नये अशी भूमिका व्यापारी मांडू लागले आहेत.

लॉकडाऊनची टांगती तलवार पाहून काहीजण पुन्हा गावी जायला निघाले आहेत. किराणा दुकानात गर्दी होऊ लागली आहे. लॉकडाऊनमध्ये व्यापारी वर्गाची देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. त्यामुळे सरकारने नागरीकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नये अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.दरम्यान,यासर्व घडामोडींचा परिणाम म्हणून व्यापारी मालाची किंमत ४०-५०% इतकी कमी करून शेतकऱ्याकडून  माल खरेदी करू पाहत आहे असे देखील काही ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे..

सुरुवातीच्या लॉकडाऊने व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातून व्यापार अजून सुरुळीत झालेला नाही. पुन्हा लॉकडाऊन झाले तर व्यापाऱ्यांचे खूप मोठी हानी होईल. या सगळ्यामुळे व्यापार संपून जाईल अशी देखील भीती व्यक्त केली जात आहे.सुरुवातीच्या लॉकडाऊमध्ये कामगार गेले, नोकऱ्या, ऑफिसेस बंद झाले, पगारी झाल्या नाहीत. सामान्य नागरिकांची गैरसोय झाली. ईएमआय भरता आला नाही. अनेकांचे लोण झाले नाही. व्यवसाय उध्वस्त झाले आहेत.

लॉकडाऊने दुकाने बंद ठेवावी लागतात. त्यामुळे शिल्लक असलेला मालाचा साठा खराब होतो. त्याला उंदरे, घुसी लागतात. उधार मालाचे पैसे येत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी व्यापार बंद केला आहे. पुन्हा लॉकडाऊने व्यापार संपेल. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. परंतु लॉकडाऊन परत नको ही मागणी जोर धरू लागली आहे.

आता पुन्हा लॉकडाऊन झाले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.सहा महिन्यात शेतीमालाला भाव मिळाला नाही आता कुठे भाव मिळायला लागताच लॉकडाऊची चर्चा होणे गंभीर आहे. कोरोनाचे गांभीर्य लोकांना समजले आहे.नियमभंग करणाऱ्यांना दंड ठोठावला जावा. सरकारने लॉकडाऊन न करता गर्दी कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांनी देखील गांभीर्य ओळखला हवे. आम्हाला मदत नको पण आमचा व्यवसाय करू द्या. व्यवसाय सुरू ठेऊन काही निर्बंध घातले तर चालतील अशी मागणी आता मार्केट यार्डातील व्यापारी अमोल घुले यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –