सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला मह्त्वाचा निर्णय; आता जुन्या ट्रॅक्टरमध्ये सीएनजी किट बसविण्यात येणार

ट्रॅक्टर

नवी दिल्लीः सध्या वाढते प्रदूषण आणि वाढते इंधन दर यामुळे पर्यावरणासह नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जुन्या वाहनांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आता जुन्या वाहनांसाठी स्क्रापिंग पॉलीसी आणण्यात येणार आहे. यामध्ये आता १५ वर्षांपूर्वीच्या वाहनांना स्क्राप करण्यात येणार आहे. तर पेट्रोल डीझेल ऐवजी सीएनजी वर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यावर सरकारकडून भर देण्यात येत आहे.

त्याच बरोबर शेतीची मशागत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरला देखील मोठ्या प्रमाणात इंधन लागते. तर देशातील जवळपास 60 टक्के कार, ट्रक, बस आणि ट्रॅक्टर डिझेलवर चालतात. वापरल्या गेलेल्या एकूण डिझेलपैकी 13 टक्के ट्रॅक्टर, शेतीविषयक उपकरणे आणि पंपसेट इत्यादींमध्ये वापरली जातात. डिझेल वाहन 7-8 पेट्रोल वाहनांएवढे प्रदूषण पसरवते. म्हणजेच ट्रॅक्टर 7-8 पेट्रोल कार इतके किंवा जास्त प्रदूषण पसरवितो, कारण ट्रॅक्टरमध्ये कारपेक्षा अधिक शक्ती असते.

शुक्रवारी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सीएनजी ट्रॅक्टरचे लोकार्पण पार पडल. यावेळी विशेष म्हणजे आता शेतकरी जुन्या ट्रॅक्टरमध्येही सीएनजी किट बसवू शकतील. शेतीत ट्रॅक्टर वापरण्यासाठी तासाला सरासरी 4 लिटर डिझेल लागते. (खर्च हा ट्रॅक्टरच्या हॉर्सपावरवर अवलंबून असतो) आणि त्याचा खर्च 78 रुपये प्रति लिटरनुसार 312 रुपये येतो. त्याचबरोबर सीएनजीवर ट्रॅक्टर चालविण्यासाठी 4 तासांत सुमारे 180 रुपये खर्च अपेक्षित आहे. एका अंदाजानुसार शेतकऱ्यांना वर्षाकाठी 1 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाने सीएनजी ट्रॅक्टरचे मानक निश्चित केलेत. त्यानुसार बाजारपेठेत हे ट्रॅक्टर उपलब्ध असतील.

ट्रॅक्टरमध्ये सीएनजी किट बसविण्यात येणार असून, यामुळे शेतीचा खर्च कमी होईल. ट्रॅक्टर लॉन्च करताना नितीन गडकरी म्हणाले की, सीएनजीच्या इतर वाहनांप्रमाणे सुरुवातीलाही ते सुरू करण्यासाठी डिझेलची गरज भासू शकेल. यानंतर ते सीएनजीवरून चालतील. मेक इन इंडिया अंतर्गत सीएनजी किट तयार आहेत. शेतीमध्ये वापरली जाणारी इतर साधने बायो-सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे, असंही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले

7 किलो शेतातल्या कचऱ्यापासून 1 किलो बायो-सीएनजी तयार करता येतो. ते तयार करण्यासाठी सुमारे 15 रुपये खर्च येईल. शेतातल्या कचऱ्याची किंमत 1200 ते 1500 टनानुसार 10 रुपयांच्या आसपास असेल. अशा प्रकारे बायो-सीएनजीची किंमत सुमारे 25 रुपये किलोवर येईल. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मते सीएनजी मार्केट दरामध्ये उपलब्ध होईल, परंतु बायो-सीएनजीचा उपयोग यशस्वी झाल्यास त्याचा वापर वाढेल.

महत्वाच्या बातम्या –