कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकही लॉकडाऊनमुळे घटली असून शेतमालाची आवक आता २० ते २५ टक्क्यांवर

शेतकरी

उस्मानाबाद – कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा परिणाम सध्या विविध क्षेत्रांवर जाणवू लागला आहे. शेती क्षेत्रावरही त्याचा गंभीर परिणाम झाला असून लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकही लॉकडाऊनमुळे घटली असून शेतमालाची आवक आता २० ते २५ टक्क्यावर आली आहे. यामुळे बाजार समितीत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी ज्वारीची आवक प्रतिदिन २०० क्विंटलच्या वर होती परंतू तीच आवक आता ५० क्विंटलवर आली आहे.हरभरा आवक १०० क्विंटल होती ती आता २५ क्विंटलवर आली आहे. मागील वर्षी या महिन्यात शेतमालाची आवक भरपूर होती. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.कोरोना प्रादूर्भाव होण्याची भिती आहे. तसेच पोलीस रस्त्यावरून जाताना अडवतील या भितीपोटी शेतकरी शेतमाल आणत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून शेतमालाच्या दरातही फटका बसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी लॉकडाऊनपूर्वी शेतमाल घातला तर मोठ्या शेतकऱ्यांनी दर चांगला मिळेल या आशेपोटी घरीच ठेवला आहे.यापूर्वी प्रत्येक दुकाननिहाय शेतमालाचा लिलाव होत होता. परंतू कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता आता एकाच ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून लिलाव केले जात आहेत. सध्या आवक कमी झाल्याने ज्वारीला २१०० ते २६५० रुपये दर मिळत आहे तर हरभरा ५ हजारावर गेला आहे.

महत्वाच्या बातम्या –