राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत चालल्याने गुळ उद्योग बंद होण्याच्या परिस्थितीत

गूळ उद्योगा

बीड – राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत चालल्याने रोज नियमात बदल होत आहे. मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सतत लॉकडाऊनला सामोरे जावे लागत आहे.याचा परिणाम सर्व उद्योग व्यवसायांवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही उद्योग बंद झाली तर काही बंद होण्याच्या परिस्थितीत आहेत. अशाच एक डबघाईत गेलेल्या उद्योग म्हणजे गूळ उद्योग. या उद्योगाला लॉकडाउनच्या काळात मोठा फटका बसला आहे.

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे बाजारात गुळाचा भाव खूपच पडला आहे. यामुळे चिंता वाढली आहे, येणाऱ्या काळात आणखीन लॉकडाऊन लागल्यास गुळ उद्योग संपुष्टात येईल अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गूळ उद्योगासाठी प्रशासनाने आर्थिक तरतूद करावी अन्यथा हा उद्योग डबघाईत जाईल.

बीड जिल्ह्यात ५० हून अधिक गूळ उद्योग सुरु आहेत . या उद्योगाचा जिल्यातील अतिरिक्त ऊस उत्पादनाला मोठा फायदा होतो. मात्र मागील काही दिवसांपासून लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे गुळाचे भाव खूप पडले आहेत. ऊस खरेदी करत प्रक्रिया करून गुळाला कवडीमोल भाव मिळत असल्याने नफा तर दूरच केलेला खर्चही मिळत नसल्याचे सांगितल्या जात आहे.

महत्वाच्या बातम्या –