लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या फुल शेतीला बसतोय मोठा फटका

परभणी – शेती सोबतच अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून इतर व्यवसायांकडे वळत असतात. त्यात फुलांची शेती हा एक उत्तम जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी याकडे पाहतात. फुलांना मागणी सुद्धा असते त्यामुळे या व्यवसायातून चांगले उत्पन्न सुद्धा शेतकऱ्यांना मिळू शकते. गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये फुलांची शेती चांगलीच बहरत असते, मात्र गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनचा मोठा फटका या व्यवसायाला सुद्धा बसला आहे. तसेच या वर्षी सुद्धा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू देखील करण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा शेतातील फुले शेतातच कुजून जात आहेत.
पारंपारिक शेतीसोबतच फुलांच्या शेतीकडे अनेक शेतकरी वळले आहेत.

परभणी तसेच नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये फुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. नांदेड शहरात या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नांदेड येथून ही फुले आंध्रप्रदेश, नागपूर तसेच इतर अनेक ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जातात. त्यातून शेतकरी फुलशेतीतून दररोज चांगले उत्पन्न कमवत होते. पण आता संचारबंदी लागू असल्याने या फुलांची मागणीत घट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फुले शेतातच कुजून जात आहेत.

पुन्हा वाढत असलेल्या या कोरोनामुळे अनेक व्यवसायांना फटका बसत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना सध्या राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाची साखळी आणखी वाढू नये यासाठी संचारबंदी सुद्धा लागू करण्यात येत आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असे आदेशही प्रशासनाने दिले आहेत तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या –