ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक सूचनांच्या गोंडस नावाखाली बाजारपेठा पुर्णपणे बंद

बंद

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये कोरानाचा कहर खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने कोराना रुग्णांची संख्या हे वाढणे खुप गंभीर स्वरुपाचे आहे. तर आता ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक सूचनांच्या गोंडस नावाखाली बाजारपेठा पुर्णपणे बंद ठेवाव्या लागणार आहेत.

जिल्हाधिकारी यांनी रात्री १०. १५ मिनीटांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये  काय सुरु असेल आणि काय बंद असणार आहे, याची माहिती या वेळी दिली. किराणा मालाची दुकाने दुध बेकरी मिठाईचे दुकान औषधी दुकान हे वगळता सर्व आस्थापन सर्व दुकाने बंद राहतील. हा लोक डाऊन नव्हे तर ब्रेक द चेन असल्याचे या वेळी जिल्हाधिकारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. शासकीय कार्यालये सुरू राहतील. मात्र कोणतेही अभ्यागतांना त्या ठिकाणी परवानगी घेतल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

हे बंद राहणार

सर्व आस्थापन सर्व दुकाने बंद राहतील. मनोरंजनाची सर्व ठिकाणे नाट्यगृह चित्रपटगृह म्युझिकल क्लब क्रीडा संकुल स्विमिंग पूल बंद राहतील. पर्यटनाच्या दृष्टीने शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये जे पर्यटक अगोदरच तिथे येऊन थांबलेली आहेत त्यांच्यासाठी दिंडोर बार सुरू राहतील मात्र त्याशिवाय सर्व बार पूर्णपणे बंद राहतील. धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद राहतील. सलून स्पा ब्युटी पार्लर बंद राहतील शाळा कॉलेजेस पूर्णपणे बंद राहतील. धार्मिक राजकीय सामाजिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहतील

हे असणार सुरु 
वकिलांची कार्यालय सुरू राहतील. कार्गो सर्विसेस सेक्युरिटी सर्विसेस डेटा सर्विसेस सुरू राहतील. नॉन बँकिंग फिनान्शियल सेवा मायक्रो फायनान्स सेवा, धार्मिक स्थळातील धार्मिक विधी सुरू राहतील, त्यासाठी केवळ दोन जणांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश असणार. पूर्वनियोजित सर्व परीक्षा चालू राहतील. पूर्वनियोजित निवडणुका घेता येतील. हा लॉक डाऊन नव्हे तर ब्रेक द चेन आहे. ज्या कारखान्यांमध्ये पण पाचशेपेक्षा जास्त कामगार असतील त्यांनी स्वतः चे आयसोलेशन सेंटर सुरू करावे. मंजूर प्रवासी क्षमतेच्या 50% परवानगी असेल.

हे देखील सुरुच असणार 

ऑक्सिजन उत्पादक कंपन्या सुरू राहतील. ई- कॉमर्स सेवा सुरू राहील. बँका मायक्रो फायनान्स करणाऱ्या संस्था सुरू राहतील. ज्या ठिकाणी कामगारांना राहण्याची व्यवस्था आहे. ते बांधकाम सुरु राहतील. रस्त्यावरचे खाद्य विक्रेते सकाळी सात ते रात्री आठ या वेळामध्येच फक्त पार्सल सेवा देऊ शकतात. त्यांना तिथे खुर्च्या टाकून खाद्यपदार्थांची विक्री करता येणार नाही. खाजगी वाहतूक सेवा आणि एसटी महामंडळाची सेवा सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू राहील. प्रसार माध्यमांची कार्यालय वर्तमानपत्राची छपाई व वितरण व्यवस्था सर्व सुरू राहील. एसटी महामंडळाच्या बसेस सुरू राहतील.

महत्वाच्या बातम्या –