लंगरमधील भोजनाचा आस्वाद चर्चेसाठी उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनीही घेतला

नवी दिल्ली – नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना आज चर्चेसाठी बोलावलं होतं. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यानची या मुद्यावरील चर्चेची ही सातवी फेरी सुरु आहे.

या चर्चेत तोडगा निघणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव, हवेची गुणवत्ता आणि वीजपुरवठा या मुद्यांवरही चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, सरकार चर्चेला तयार आहे. पण कृषी कायदे रद्द केले पाहिजेत त्यानंतरच चर्चा असे शेतकऱ्यांची मागणी आहे. याच मुद्द्यावरून लाखो शेतकरी गेले महिनाभर दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत.

थंडीच्या कडाक्याच्या देखील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनामध्ये शेतकरी स्वतःची काळजी देखील नीट घेत असल्याचं दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या जेवणासाठी लनगरची सेवा देखील दिली जात आहे. केंद्र सरकारच्या चर्चेवेळी सरकारचा चहा देखील या शेतकऱ्यांनी नाकारला होता. तर, विज्ञान भवनात होणाऱ्या चर्चेसाठी लंगरमधून आलेलं जेवणच हे शेतकरी प्रतिनिधी खातात.

आज मात्र या लंगरमधील भोजनाचा आस्वाद चर्चेसाठी उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी देखील घेतल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी विज्ञान भवन येथे शेतकऱ्यांनी आणलेलं जेवण केलं. आंदोलनाच्या सुरुवातीपासून आज पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत अशाप्रकारे जेवण केलंय. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –