राज्यात गेल्या २४ तासात कोरोना बाधीत रुग्ण संख्येत मोठी वाढ

मुंबई – कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

राज्यात आज ३०५३५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ११३१४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण २२१४८६७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण २१०१२० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८९.३२% झाले आहे.

गेल्या चार दिवसात फक्त महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी आजही हे आकडे गांभीर्याने घेतले नाहीत. तर भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवण्याती शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आतातरी वेळीच सावध होण्याची जास्त आवश्यकता आहे.

महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा वाढतच आहे.

महत्वाच्या बातम्या –