औरंगाबाद – एप्रिल महिन्यात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने कोविड केअर सेंटर व रुग्णालयातील सर्वच बेड्स फुल्ल झाले होते. मात्र मे महिन्यात रुग्णसंख्या घटत आहे. सध्यस्थितीत शहरात केवळ १,३४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच होम आयसोलेशनमधील संख्याही ५२३ आहे. परिणामी सरकारी रुग्णालयांसह आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
औरंगाबाद शहरात फेब्रुवारी महिन्यात तिसर्या आठवड्यापासून कोरोनाच्या दुसर्या लाटेने डोके वर काढले. मार्च आणि एप्रिल महिन्यात वाढत्या रुग्णसंख्येने आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडत उच्चांक गाठला होता. मार्च महिन्यात शहरासह जिल्ह्यात तब्बल ३२ हजार ३१३ बाधित निघाले. तर एप्रिल महिन्यात सुमारे ४१ हजार नवीन कोरोनाबाधित आढळले. यामुळे एप्रिल महिन्यात शहरातील बाधितांची सक्रिय रुग्णांची संख्या ही १० हजारांवर पोहचली होती. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेड्स उपलब्ध नसल्याने शासन निर्देशांनुसार सौम्य लक्षणे असलेल्या सुमारे चार हजार रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत होते.
दरम्यानच्या काळात पालिका व जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवल्या. परिणामी, मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यासह शहरात रोज नव्याने आढळणार्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. १ मे वगळता जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा हजारापेक्षा कमी होऊन ६०० ते ७०० पर्यंत खाली आला आहे. आजघडीला शहरात केवळ १३४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे पालिकेचे कोविड सेंटर्स, मेल्ट्रॉन, घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून आरोग्य यंत्रणेचा ताण कमी होऊन दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी -राज्याच्या रिकव्हरी रेटमध्ये मोठी वाढ तर गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान किसान योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी थेट बांधावर बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन द्या – बच्चू कडू
- ६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू – नितीन राऊत
- राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ