आज मुख्यमंत्र्यांनी बोलाविली टास्क फोर्सची बैठक, राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय येण्याची शक्यता

उद्धव ठाकरे

मुंबई – सर्वपक्षीय बैठक शनिवारी सायंकाळी पार पडल्यानंतर आज कोरोनाविषयीच्या टास्क फोर्सची महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलाविली आहे. या बैठकीतच राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही? लावायचा ठरल्यास त्याचा कालावधी किती दिवसांचा ठरवायचा? याविषयीचा निर्णय या बैठकीत होणार असल्याचे समजते आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यंमत्र्यांसह आरोग्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनविषयीचा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या.

कोविडचं अनर्थचक्रथांबवायचं असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, लोकांच्या जीवाला पहिलं प्राधान्य द्यावंच लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या बैठकीत सांगितलं. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्वपक्षांनी एकमुखानं याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावं आणिलोकांमध्ये जागृती निर्माण करावी. असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या बातम्या –