राज्यातील ‘या’ जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे आता ‘हे’ निर्बंध लागू होणार

नागपूर – गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

राज्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन व कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागपूरमधील वाढती रुग्ण संख्या व मृत्यू दरातील वाढ हि चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये लॉकडाऊन लागू केला जाईल अशा चर्चा सुरु होत्या. सामान्यांनी मात्र लॉकडाऊन करण्यास विरोध केला होता.

आज, नागपूर जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी पालकमंत्री नितीन राऊत, मुंबईहून गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपुरात कुठलेही स्थानिक निर्बंध १ एप्रिलपासून राहणार नाही. तर, राज्य शासनाने २७ मार्च रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ रात्रीची जमावबंदी राहणार असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नागपूरकरांवरील लॉकडाऊनचं संकट सध्या तरी टळलं आहे. दरम्यान, स्थानिक निर्बंध रद्द करण्यात आले असले तरी राज्य शासनाच्या निर्देशाचे कडकपणे पालन करण्यात येणार असल्याचे देखील राऊत यांनी सांगितले आहे.

नागपूर मध्ये आता हे नियम लागू –

  • रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त व्यक्तींना बाहेर पडता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला प्रत्येकी १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
  • सर्व सार्वजनिक स्थळे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील.
  • कंटेन्टमेंट झोनबाबत स्थानिक प्रशासनाने घेतलेले आदेश लागू राहतील.
  • मास्कशिवाय फिरणाऱ्याला ५०० रुपये आणि रस्त्यावर थुंकणाऱ्याला १ हजार रुपये दंड भरावा लागेल.
  • सर्व सिनेमाघर, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट रात्रीचे बंद राहतील.
  • सरकारी कार्यालयातील गर्दी कमी करावी . महत्त्वाच्या कामांसाठी येणाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे.
  • जाहीररित्या होणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी.
  • लग्नात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश नसेल.
  • अंत्यसंस्काराला २० पेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये.
  • मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित वापरचे पालन करणे या सर्व उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी व्हावी.

महत्वाच्या बातम्या –