‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ

कोरोना

नांदेड –  जिल्हाभरामध्ये कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी
वाढ होत चालली आहे. रविवारी रात्री कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्या मुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जिल्ह्याभरात कोराना रुग्णांची संख्या २३हजार १४९ झाली आहे. तर ५९२ जण कोरोनाने दगावले आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई, अमरावती, अकोला, बुलडाणा या ठिकाणी कोराना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमात वाढली आहे. रविवारी जिल्हा प्रशासनाला १ हजार ३०६ जणांचे अहवाल मिळाले आहेत. त्यात १२४१ जण निगेटीव्ह तर ६० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आरटीपीसीआर तपासणीत नांदेड (मनपा क्षेत्र) – २३, उमरी – १, धर्माबाद – १, मुदखेड – १, किनवट – ८, नांदेड ग्रामीण – १ , माहूर – १, हिंगोली – १, हतगाव १, आदिलाबाद – १, तर अँन्टीजेन तपासणीत नांदेड मनपा – १०,हिमायतनगर – १, देगलूर – १, किनवट ५, हदगाव – ३, उमरी – १ असे रुग्ण आढळले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २९, जिल्हा रुग्णालयात ३८, किनवट – ६, हदगाव – ७, देगलूर ४, मनपात गृहविलगीकरण १७४, ग्रामीण भागातील गृहविलगीकरण – ४५, खासगी रुग्णालयात ३९ जण उपचार घेत आहेत. उपचार चालु असेलेल्या ३४२ पैकी १४ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्हाभरात आत्तापर्यंत ५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –