थंडीने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र गारठला

थंडीने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र गारठला winter

थंडीने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. तर काल ३० जानेवारी २०२० रोजी सर्वात कमी किमान तापमान नाशिक जिल्ह्यातील निफाड मध्ये ६ अंश होते तर मुंबईचे तापमान १३.६ वर आले. तीन ते चार दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणांचे किमान तापमान खाली घसरले आहे.

दोन दिवसांत थंडी परत येणार !

काल ३० जानेवारी २०२० रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणांचे किमान तापमान १0 अंशांच्या खाली नोंदविण्यात आले आहे. पुढील २४ तासांत किमान तापमानाचा पारा खालीच राहील असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर मात्र किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुण्याचा पारा पाेहचला 10 अंशावर

मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे आणखी दोन ते तीन दिवस वाहतील. परिणामी किमान तापमान सामान्यापेक्षा कमी राहील. मात्र आता वाऱ्याची दिशा बदलणार आहे. २ फेब्रुवारीनंतर उत्तरेऐवजी दक्षिण/आग्नेय दिशेने वारे वाहतील. हे वारे रायलसीमा आणि अंतर्गत कर्नाटक येथून वाहत येथे येतात. तेथे तापमान आधीच जास्त आहे. हे दमट वारे मुंबईतील तापमानात वाढ करू शकतात.