केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांवरील सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी दिली परवानगी

कोरोना लस

नवी दिल्ली – भारतात एका बाजुला कोरोनाचे रुग्ण वाढत जात असताना दुसऱ्या बाजुला कोरोना लसीचा समावेश सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात केला जाणार नसल्याचे उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता.

‘कोरोना लसीचा समावेश सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात करुन भारतातील सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा सरकारचा विचार आहे का?’असा प्रश्न सुळे यांनी विचारला होता. विशेष म्हणजे २० सप्टेंबर २०२० रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशातील सर्व नागरिकांना लस मिळेल, असे सांगितले होते. त्यामुळे लस देण्यावरुन केंद्र सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे समोर आले होते.

मात्र त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यांनतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतामध्ये अत्यंत वेगाने आणि चांगल्या पद्धतीने करोना प्रतिबंधक लसींचे लसीकरण केलं जात आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.

आतापर्यंत चार कोटी ८५ लाख करोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी चार कोटींपेक्षा असे व्यक्ती आहेत ज्यांना करोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असं जावडेकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्याचप्रमाणे मागील २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना करोनाचे डोस देण्यात आले आहेत अस देखील जावडेकरांनी सांगितल.

महत्वाच्या बातम्या –