‘या’ जिल्ह्यातील ६५ गावे नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी – गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील

मुंबई – अनेक दिवसांपासून रखडलेल्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुका व 65 गावे नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता  मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला.

गुणवत्ता परिक्षण पथकाकडून पाहणीचे निर्देश

अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व गुणवत्ता परिक्षण पथक यांनी एकत्रितपणे या योजनेस भेट देऊन त्या भेटीचा निरीक्षण अहवाल पाणी पुरवठा विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिले.

योजनेवरील प्रत्येक उपांगाचे किती काम झाले आहे याची पाहणी करून त्यानंतरच कंत्राटदाराविषयी योग्य तो निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. पालम तालुका व 65 गावे नळपाणी पुरवठा योजनेबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे बैठक आयोजित करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

यावेळी परभणीचे माजी खासदार  सुरेश जाधव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अन्य अधिकारी  उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –