…..तर २ दिवसात राज्यात पूर्ण लॉकडाऊन करणार – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले आहेत, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता जनतेशी सवांद साधला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील.

मला नियम पळताना दृश्य स्वरूपात दिसलं नाही तर २ दिवसात पूर्ण लॉकडाऊन करणार, आता लावत नाही पण हा इशारा देतोय. तसेच मला दोन दिवसांत जर कोणतेही पर्याय नाही मिळाले तर दुर्दैवाने मला लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे.

दरम्यान उद्यापासून पुण्यामध्ये पुढील सात दिवसांसाठी हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर हॉटेलमधून होम डिलेव्हरी सुरु राहणार आहे. तर पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहे. दरम्यान, सर्व धार्मिक स्थळे देखील पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत अत्यावशक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. तर ९ एप्रिलला पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –